(पीव्हीसी पाईप ठिबक साहित्य,पाणी असून शेतीच्या नूतन सिंचन व्यवस्थेला बसला खो)
सोलापूर // प्रतिनिधी
मागील तीन महिन्यापासून शेतीच्या सिंचन व्यवस्थेचा प्रमुख स्तंभ असलेल्या पीव्हीसी पाईपचे 40 टक्केनी तर ठिबक साहित्याचे भाव 15 टक्केनी वाढले आहेत त्यामुळे पाणी असून ही शेतीसाठी नव्याने सिंचन करण्याला खो बसला आहे
मागील 10 महिन्यापासून कोरोनाचे उभे ठाकलेल्या संकटामुळे देशात लॉकडाऊन असल्याने शेतकऱयांना कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला अशातच मागील 10 वर्षाच्या तुलनेत यावर्षी दिलासादायक पाऊस झाला असतानाच परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे एका बाजूला शेतकरी कोरोनाच्या संकटातून सावरतो न सावरतो तो पर्यंत परतीच्या पावसाचा आहाकार आणि अशातच सिंचन साहित्याचे गगनाला भिडलेले भाव असल्याने सिंचन साहित्य खरेदी करून शेती करणे आवाक्याबाहेर गेले असून यामधून सावरण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे
भारत देश जगभरात कृषी प्रधान देश म्हणून परिचित आहे एका बाजूला शासन शेतकऱ्यानां स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी विविध योजनांचा माध्यमातून आर्थिक मदत करीत आहे असे असताना 2020 साल अखेरीस आले तरी अद्याप ठिबक अनुदानासाठी पूर्व संमती घेण्यासाठी ऑनलाइन सुरू झाले नसल्याने 2020 सालात ठिबकला अनुदान मिळण्याची शक्यता धसुर झाली आहे तर दुसऱ्या बाजूला ठिबक आणि पीव्हीसी पाईपचे दर उच्चांकी झाले आहेत त्यामुळे ठिबक करावे तर शासनाचे अनुदान मिळणार की नाही याची हमी नाही आणि अनुदानाची वाट न पाहता ठिबक करावे तर वाढलेले भाव परवडणारे नाहीत त्यामुळे शेतकऱयांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
मागील 10 महिन्यापासून देशभर कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या कालावधीत शेतीमालाला कवडीमोल भाव मिळाला आहे अशातच परतीच्या अतिरिक्त पावासाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे असे असताना उत्तम प्रकारे पाऊस झाला असल्याने पाणी मुबलक आहे परंतु शेतीच्या सिंचनासाठी लागणारे पीव्हीसी पाईपचे भाव तीन महिन्यात 40 ते 42 टक्के तर ठिबक साहित्याचे भाव 15 टक्के एवढे उच्चांकी झाले असल्याने साहित्य खरेदी करून शेती पिकविणे अशक्य झाले आहे
पीव्हीसी पाईप ठिबक साहित्य याची निर्मिती करण्यासाठी लागत असलेल्या कच्च्या मालाचा तुटवडा झाला असल्याने कच्चा माल जास्तीच्या भावाने विकत घ्यावा लागत आहे त्यामुळे पीव्हीसी पाईप आणि इतर साहित्याचे भाव उच्चांकी वाढले असल्याने शेतकऱयांना खरेदी करणे अवघड झाले आहे याची शासनस्तरावर दखल घेणे गरजेचे असल्याचे कोठारी पाईपचे कार्यकारी संचालक उज्वल कोठारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले
पावसाळा चांगला झाला आहे परंतु पाईपचे दर वाढले असल्याने गरज असताना ही पाईपची खरेदी करण्यासाठी भाव कमी होई पर्यंत वाट बघावी लागणार आहे
आंतराष्ट्रीय पातळीवर कच्च्या मालाचे दर वाढले असल्याने सिंचन साहित्याचे वाढलेले दर कशा पद्धतीने कमी करता येतील यासाठी त्वरीत प्रयत्न करू

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.