कोल्हापूर विमानतळावर ऑनलाइन टॅक्सी बुकिंग काऊंटर चे उद्घाटन कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया यांच्या हस्ते झाले ताज इंडिया टूर ही ट्रॅव्हल ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेमार्फत विमानतळावर एजन्सी टॅक्सी सर्विसेस तसेच तिकीट बुकिंग, हॉटेल आरक्षण ,रुग्णवाहिका इत्यादी सेवा माफक दरामध्ये या काउंटरवर ऑनलाईन तसेच ऑफलाईन पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असून घरबसल्या किंवा ऑफिसमधून ही विमान हॉटेल टॅक्सी यासारख्या सुविधांचे बुकिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व सेवांच्या बाबतीत सुसूत्र पणा येणार असून प्रवाशांकडून या या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी ताज इंडियाचे व्यवस्थापक किशन सिंह व सुनील कुमार ट्रू जेट कंपनीचे व्यवस्थापक अजित कुमार, अलाइंस एअर विजय घाडगे , इंडिगो एअरलाइन्स विशाल भार्गव तसेच यावेळी विमानतळ कर्मचारी प्रकाश डुबल, ऋतुराज भोसले, सोमनाथ लोखंडे डीएम शास्त्री रावसाहेब माने संदीप श्रीवास्तव व रिक्षा व टॅक्सी युनियनचे अजिंठा नसलापुरे ,शिवाजी धनगर, मेहबूब शेख, राकेश कांबळे आदी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.