सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावाचे सुपुत्र सध्यास्थित मुंबईत कार्यरत असणारे अणूजीव शात्रज्ञ मा. संतोष जठार यांना जाहीर.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मुळ वैराग गावचे मा. संतोष जठार हे उच्चविद्याविभूषित असून आता सध्यास्थित ते मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जठार यांचा उल्लेख देशभरातील अणुजीव शास्त्रज्ञांमध्ये एका अतिशय प्रामाणिक व वेगवेगळी संशोधन करणारे शास्त्रज्ञ असा देशभर नावलौकिक आहे. तर आपले कार्य करत असताना त्यांनी मुंबई महापालिकेच्या अन्न व पाणी नमुने तपासणी या प्रयोगशाळेला आय.एस.ओ.17025 मानांकन प्रथम तसेच या प्रयोग शाळेस जागतिक दर्जा मिळवून देण्यामध्ये त्यांचा मौलाचा वाटा आहे. बर्फ नमुने ,शालेय मध्यान्ह आहार, चहा , व इतर घटक व आहार बाबत संशोधन करून त्यांचे अहवाल शासनास पाठवून व त्यांचे अहवाल महाराष्ट्र शासनाने मान्य करून त्यांची अमलबजालणी केली आहे. असे अनेक महनीय कार्य श्री संतोष जठार यांच्या झाले आहे. त्यांचे कार्य आपण आपल्या आयकॉन सोहळ्याच्या भव्य अशा स्क्रीनवर पाहणार आहातच.
युगदर्शक बार्शी आयकॉन, सोलापूर जिल्हा आयकॉन, पोलीस आयकॉन, महसूल आयकॉन व सरपंच आयकॉन पैकी मा. संतोष जठार यांना सोलापूर जिल्हा आयकॉन हा मानाचा व सलग आठव्या वर्षात जाणारा पुरस्कार जाहीर करताना आमचा उर अभिमानाने भरून येत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.