विस्थापित नगर मधील गोरगरीब महिलांकडून चक्क बळीराजाचे माऊली हळणवर यांचा केला सत्कार




सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर नगरपालिकेने अतिक्रमण हटाव कारवाई करीत असताना नोटीस न देता कारवाई सुरू केलेली होती अनेक धनदांडग्यांची अतिक्रमण न हटवता गरिबांच्या  घरावरती बुलडोजर फिरवण्याचे काम केले होते विस्थापित नगर येथील घरकाम करणाऱ्या हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांची घरे पोलीस बळाचा वापर करत पाडायला सुरुवात केलेली होती गरिब महिलांचा आक्रोश पाहून माहिती मिळतात बळीराजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर हे तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले व आक्रमक होत ही कारवाई थांबवत नगरपालिकेला निवेदन दिले त्यानंतर नगरपालिकेच्या समोर सर्व नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन केले याची दखल नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतलेली नव्हती परंतु पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचे पती नागेश काका भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तोडगा काढून हे आंदोलन थांबवले होते व जाहीररीत्या नगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी या गरिबांच्या घराला हात लावणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित झाले होते या महिलांनी एकत्र येत  आमच्या झोपड्या वाचल्या म्हणून आनंदात भावनिक वातावरणात काल माऊली भाऊ हळणवर यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना आशाताई नांगरे म्हणाल्या की गोरगरिबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलात आमचा संसार  लेकरेबाळे  उघड्यावरती  येणार होते  ते आपण वाचवले  आमच्या जीवाला  आपण  एक मसिहा च  आहात त्याची कृतज्ञता म्हणून आम्ही गरिबांनी वर्गणी काढून हार नारळ पेढा आणून तुमचा सत्कार केला आमचा गरीबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहील सत्काराला उत्तर देताना माऊली हळणवर म्हणाले की गेली अनेक वर्ष गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या वरती प्रस्थापितांच्या विरोधात मी कायमच लढत आहे अनेक वेळा जेलमध्ये ही  गेलो आहे अनेक वेळा मोठ मोठ्या हस्ती किंवा व्यक्तीकडून माझा सत्कार झाला परंतु हा सत्कार माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय सत्कार असून मी कधी विसरणार नाही तुमचा गरिबां च्या पाठीमागे कायमच खंबीरपणे उभा राहणार असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने काम करीन यावेळी वातावरण भावनिक झाले होते उपस्थितांना सह सर्वांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले पंकज देवकते उत्तम बाबा चव्हाण संतोष भोसले संजय लवटे यांचाही सत्कार करण्यात आला विस्थापित नगरातील महिला आशाताई नांगरे अस्मिता धोत्रे अनिता कदम यांच्यासह  सर्व नागरिक  व  परिसरातील  मुलेबाळे  उपस्थित  होते उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget