वृत्तसंस्था // प्रतिनिधी
श्रीपूर ता.माळशिरस येथील रोटरी क्लब श्रीपूर कडून महाळुंग कोविड सेंटरला कोविड सेंटरचे इन्चार्ज व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर शेख यांना ऑटोमॅटिक ऑक्सिजन जनरेट मशीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.हरीष मोटवानी व प्रेसिडेंट डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते देण्यात आले.कोरोना महामारीच्या काळा मध्ये जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केलेल्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मार्च 2020 इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनासन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे व कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक गव्हर्नर रोटेरियन हरीष मोटवानी यांनी श्रीपूर रोटरी क्लबला भेट देऊन क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अनिल चांडक, प्रेसिडेंट डॉ.यशवंत कुलकर्णी, रेणू मोटवानी, किरण मोटवानी, सचिव संदीप लोणकर, डॉ.समीर शेख, डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील,बाळासाहेब कामते, डॉ.सुधीर पोफळे, डॉ.सुनील फडे, विनय पन्हाळे, धनंजय कचरे, तानाजी भोसले, दत्ता नाईकनवरे, ए.जी. गुरुनाथ वैद्य,राहुल साठे, समीर कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. सारिका नाईकनवरे यांनी कोरोनायोद्धा यांच्यासाठी कविता सादर केली. यावेळी पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे व डॉ.सुधीर पोफळे यांनी केले तर आभार संदीप लोणकर यांनी मानले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.