विभागीय रेल्वेचे चेअरमन खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व रेल्वेचे राज्यांचे जनरल मॅनेजर यांचा सोलापूर जिल्हा दौरा--



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

आज दिनांक 18/12/2020 शुक्रवार रोजी रेल्वेचे विभागीय चेअरमन खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेच्या बाबतीत नागरिकांच्या प्रवासी अडचणी निवेदन सूचना समस्या ग्राहकांच्या अडचणी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किसान रेल्वे संदर्भातील अडचणी व आढावा दौरा आयोजित केला असून या दौऱ्यासाठी महाराष्ट्र राज्यांचे सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर संजय मित्तल हे दौऱ्यात बरोबर राहणार आहेत सोलापूरचे डीआरएम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारचा दौरा प्रथमच होत आहे हा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. सांगोला 12:05 वाजता पंढरपूर 1:10 वाजता कुर्डूवाडी 3:20 वाजता या वरील सर्व ठिकाणी बैठका होणार असून सोलापूर चे खा जयसिध्देशवर स्वामी यांच्या सह जिल्ह्यातील सर्व आमदार त्या त्या ठिकाणी उपस्थित राहतील भाजपचे पदाधिकारी मंडळ अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी  यांनी उपस्थित राहावे किसान रेल संदर्भात अडचणी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या अडचणी लेखी स्वरुपात द्यावे असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget