प्रमोद जाधव यांचा नवीन्यपूर्ण उपक्रम.
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कुरुल ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरा मध्ये (दि. 18 रोजी) सभा आयोजित केली होती. यावेळी तीनही पॅनलचे प्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये. यासाठी कुरुल येथील युवा नेते प्रमोद जाधव यांनी ही संकल्पना मांडली आणि लगेच सर्व उपस्थिता समोर प्राध्यापक माउली जाधव यांच्याकडे रोख एक लाख रुपये दिले.मोहोळ तालुक्यातील कुरुल ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्यास , कुरुल ग्रामपंचायतीला प्रमोद जाधव यांच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे .
या उपक्रमामुळे सर्व ग्रामपंचायतीसमोर एक आदर्श निर्माण होईल. या काळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद - विवाद , गट - तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध करावी . गावातील होतकरू , निर्व्यसनी , योजनांची माहिती असणाऱ्या तरुणांनी व सर्व ज्येष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे . यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल . राज्यामध्ये शिवसेना , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन टोकाच्या विचारांच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले . टोकाच्या विचारांचे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात , त्या पद्धतीने गावाच्या विकासासाठी गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध करता येऊ शकेल , असा विचार करून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. असे युवा नेते प्रमोद जाधव यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे निवृत्ती पवार राम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष निकम अरुण जाधव बाबासाहेब जाधव प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव लक्ष्मण पाटील भारत जाधव गहिनीनाथ जाधव आनंद जाधव पांडुरंग जाधव सुरेश जाधव माणिक पाटील आदींची उपस्थिती होती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.