ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेतील विविध धार्मिक विधींसाठी परवानगी मिळावी याकरीता




आमदार प्रणिती शिंदे यांचा तातडीने मा. मुख्यमंत्र्यांशी संपर्क


सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरात जानेवारी महिन्यामध्ये ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा दरवर्षी भरत असते. या यात्रेमध्ये शहरातील व आजूबाजूच्या शहर, जिल्ह्यातून बहुसंख्य भाविक यात्रेकरीता येत असतात. श्री सिध्देश्वरांचे योगदंडाचे प्रतिक असे विविध समाजाचे 7 नंदीध्वज आहेत. सदर नंदीध्वजाचे दि. 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असतात. गेल्या 800 ते 900 वर्षापासून सदरची यात्रा सुरु आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या यात्रेस खंड पडू नये म्हणून या यात्रेमध्ये श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी भाविकांची संख्या मर्यादित ठेवून, शासनाच्या निर्बंधाचे पालन करण्यास तयार आहे. तसेच प्रत्येक नंदीध्वजाचे 100 नंदीध्वजधारक म्हणजेच एकूण 700 नंदीध्वजधारक व सेवेकरी तसेच शहरातील प्रतिष्ठित भाविक व यात्रेतील मानकरी असे 300 भाविक मिळून एकूण हजार लोकांनाच सहभागी होता यावे अशाप्रकारचे नियोजन सदर पंचकमिटीच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत दि. 11 डिसेंबर 2020 रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे व श्री सिध्देश्वर पंचकमिटी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये  सदरचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे सादर करण्याचे ठरले. तसेच त्याचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदे यांनी करावा असे मत मा. जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले. त्याप्रमाणे सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तो प्रस्ताव शुक्रवार दि. 18 डिसेंबर 2020 रोजी श्री. किशोर राजे निंबाळकर, मा. सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन, मुंबई यांची सही होवून श्री. अभय येवलेकर, संचालक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे गेलेली आहे. त्यानंतर सदरचा प्रस्ताव सोमवार अथवा मंगळवार मा. मुख्यमंत्र्यांकडे सहीकरीता जाणार आहे. याबाबत आमदार प्रणिती शिंदे या सतत मा. मुख्यमंत्री कार्यालय व श्री सिध्देश्वर यात्रा पंचकमिटी व मानकरी श्री. हिरेहब्बू यांच्या संपर्कात आहेत. सदरच्या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदे यांच्यामार्फत करण्यात येत असून लवकरच त्याला मान्यता मिळेल.



Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget