वृत्तसंस्था // प्रतिनिधी
येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगअँड रिसर्चच्या डिग्री आणि डिप्लोमाच्या एकूण २० विद्यार्थ्यांची फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स अँड दाना इंडिया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी दिली.
हि निवड यशस्वी ग्रुप पुणे यांच्या द्वारे करण्यात आली यावेळी या कंपनीचे एच आर श्री. नितीन तेटे उपस्थित होते. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स हि कंपनी पुणे येथील चाकण या ठिकाणी असून दाना इंडिया हि हिंजवडी या ठिकाणी आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत डिग्री इलेक्ट्रिकल विभागातील ५ विद्यार्थ्यांची व डिग्री मेकॅनिकल विभागातील ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर दाना इंडिया या कंपनीत डिप्लोमा मेकॅनिकल विभागातील ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अशा एकूण २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्यात आली.निवड झालेल्या सर्व विद्या

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.