पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील बंधारे दुरुस्तीसाठी रु.13.00 कोटी मंजुर- आ. प्रशांत परिचारक





सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील वाहणारी भीमा, माण, निरा-सिना, बोरी, भोगावती नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने रू.13.00 कोटी इतर निधी मंजूर करून काम सुरू करण्याचे आदेश पाणीपुरवठा मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिली असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.


या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार शहाजी पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.मुंडे, अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर श्री. डी. बी. साळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीवरील वडापूर-सिद्धापूर-उचेठाण- बठाण व पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी-गुरसाळे-सरकोली हे बंधारे तसेच माण नदीवरीती शेटफळ-गंजेगाव-तनाळी- मारापुर-घरनिकी-मल्लेवाडी धर्मगाव या बंधार्‍याचे दरवाजे, तटरक्षक भिंती, भराव आदींचे मोठ्या प्रमाणावर ती महापुरामुळे नुकसान झाली आहे. माण नदीला 50 वर्षात जेवढे पाणी वाहिले नाही. त्यापेक्षा जास्त प्रमाणात गेल्या वर्षभरात पाणी वाहून गेले आहे. भविष्य काळामध्ये या बंधाऱ्यामध्ये पाणी साठा करायचा असेल तर या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे.


जिल्हा नियोजन समितीमधून बंधारे दुरुस्तीचे कामासाठी मोठी निधी देता येत नाही म्हणून पूर नुकसान दुरुस्ती (फ्लड डॅमेज रिपेअरींग) या योजनेमधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांची समवेत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांनी दिले होते

त्या अनुषंगाने आजश दि.25/01/2021 रोजी पुणे येथे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांचे समवेत बैठक पार पडली.


या बैठकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील बंधार्यात दुरुस्तीचे आग्रही मागणी करताना पंढरपूर शहराचा बंधारा पूर्ण तुटला असून तो दुरुस्ती करणे करिता पंढरपूर नगर पैसे देणे रक्कम खर्च केली आहे, पण तेथे अजून भक्कम पद्धतीने काम करण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून शासनाने निधी दिली पाहिजे, तो बंधारा दुरुस्त केला नाही तर पंढरपूर तालुक्यातील 6 ते 7 लाख नागरिकांना व यामध्ये पाणी मिळणे कठीण होणार असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले.


त्या दृष्टिकोनातून आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी वरील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी तातडीने रू. 13.00 कोटी इतका निधी देऊन सदर काम तातडीने सुरू करण्याचे आदेश पाणीपुरवठा मदत व पुनर्वसन सचिव- किशोरराजे निंबाळकर यांना दिले. त्याचबरोबर माळशिरस, माढा, अक्कलकोट, मोहोळ, तालुक्‍यातील निरा 3, सिना 5, बोरी 6, भोगावती 2, माण 15 व भीमा 8 अशा या नद्यांवरील सुमारे 39 बंधारे तातडीने दुरुस्त करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी आ. परिचारक यांनी सांगितले.


भीमा नदीवरील पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याच्या पाणीप्रश्न अवलंबून असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात नद्यांवरील बंधारे दुरुस्त करण्याचा विषय उचलून धरल्यामुळे हा प्रश्न त्वरित मार्गी लागला. यामुळे पुढील काळात भीमा नदीवरील पाणी साठविणे शक्‍य होणार असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget