सोलापूर // प्रतिनिधी
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित फॅबटेक पब्लिक स्कूल, सांगोला येथील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय गायन स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. २६ जानेवारी निमित्त राहूल सावंत इंग्लिश मिडियम स्कूल पुसेसावळी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन गायन स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूलमधील इ. २ री तील विदयार्थी जगदीश गोरख खताळ याने १ ली ते ४ थी या गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळविला . अत्यंत चुरशीच्या अशा स्पर्धेत आपल्यातील गायनाच्या अंगभूत गुणाला विकसित करून त्याने हे यश संपादन केले.
विद्यार्थ्याच्या या यशाचे फॅबटेक एजुकेशन सोसाटीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्री भाऊसाहेब रुपनर यांनी कौतुक करून त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर , संचालिका सौ. सारिका रुपनर , कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, शाळेच्या प्राचार्या शिल्पा कोळेकर , सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी यशस्वी विद्यर्थ्याचे अभिनंदन केले व त्याला शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.