येत्या 29 जानेवारी ला वीज बिल माफीसाठी पंढरपुरात मनसेचा मोर्चा



साखर कारखान्यांकडून होणाऱ्या वीज बिल वसुलीला मनसेचा तीव्र विरोध


पंढरपूर // प्रतिनिधी 

बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीज बिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरु केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या वीज बिल वसुलीला मनसेने  तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करुन देण्याचा साधा विचार जरी केला तरी साखर कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडोसहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी आज येथे  पत्रकार परिषदेत दिला.


 दरम्यान येत्या 29 जानेवारी रोजी घरगुती आणि शेतीपंपाच्या थकीत वीजबिल माफीसाठी मनसेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्य़ात येणार असल्याचेही श्री. धोत्रे यांनी जाहीर केले. वीज बील वसुलीवरुन येत्या काही दिवसात सरकार आणि मनसेमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



श्री. धोत्रे म्हणाले, कोरोना,अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अनेकांचा रोजगार गेला आहे. शेतकर्यांचा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  वीज वितरण कंपनी आणि  राज्य सरकारने शेतकर्यांच्या शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे  विज बील माफ करुन दिलासा देण्याची गरज आहे. उर्जामंत्री आणि सरकारमधील इतर  मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीच वीज बिला बाबत परस्पर विरोधी विधाने करु लागली आहेत.यामध्ये सर्वसामान्य लोकांची कोंडी झाली आहे. 


कोरोना काळात वीज बिलात सवलत देवू म्हणणारे सरकार आता वीज बिल भरा अन्यथा विज पुरवठा बंद करु अशी धमकी देत आहेत. 


परंतु सरकारच्या अशा  धमक्यांना शेतकरी भीक घालणार नाहीत. संपूर्ण वीज बिल माफ करावे यामागणीसाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने पंढरपुरातून सरकारच्या वीज बिल वसुलीला  विरोध म्हणून  आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. येथील 29 जानेवारी रोजी हजारो  शेतकर्यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली तातडीने थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.



वीज वितरण कंपनी आणि साखर कारखानदारांमध्ये वसुलीसाठी साठेलोटे सुरु आहे.  राज्यातील एकाही साखर कारखान्यांनी वीज बिल वसुलीचा ठेका घेतला तरी त्या- त्या साखर कारखान्यांच्या दारात बसून आंदोलन करु. साखर कारखान्यांनी आधी शेतकर्यांच्या  गाळप केलेल्या उसाचे  पैसे द्यावेत मगच वीज वितरण कंपनीचा  बिल वसुलीचा ठेका घ्यावा. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उस बिलातून वीज बिलाचा एक रुपयाही वसुल केला तरी कारखाने बंद पाडू असा इशाराही यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिला.


यावेळी मनसेच्या वतीने पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांना तीळगुळ वाटप करुन सन्मान केला. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, नागेश इंगोले, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अनिल बागल,कृष्णा मासाळ महेश पवार,सागर बडवे, पुजारी, शुभम काकडे,आदी उपस्थि होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget