सोलापूर // प्रतिनिधी
बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनाचा आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मिळणाऱ्या मदतीसाठी करण्यात आलेल्या बोगस बांधकाम कामगारांची नोंदणीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित केले.
सोलापूरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय मार्फत होणाऱ्या बांधकाम कामगार नोंदणी बोगस कामगारांची झाली असून यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा घोटाळा सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे . यांची सखोल चौकशी व्हावी अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेना सोलापूर तसेच बहुजन असंघटीत कामगार आघाडी , युवक पॅनतर बांधकाम कामगार गृहनिर्माण संस्था , रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया , श्रीराम सेना व आरपीआय , बहुजन कामगार संघटना आणि संघटनानी केली होती . त्यावरुन मा . जिल्हाधिकारी साहेबांनी आज दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी सर्व कामगार संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांनी संयुक्त बैठक बोलविली त्यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) , आरपीआयचे सुबोध वाघमोडे , बहुजन आघाडीचे मनोज ऐकमल्ले व इतर प्रतिनिधी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे आणि सहाय्यक कामगार कार्यालयचे कर्मचारी यांच्यावर समर्थपणे बोगस बांधकाम कामगार नोंदणीचे पुरावयास माहिती दिले . कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी सहाय्यक कामगारांचे येलगुंडे आणि महिला अधिकारी यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी केली . त्यास उपस्थितीत सर्व कामगार संघटनानी पाठिंबा दिला . शेवटी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्याचे घोषित केले .
मा . जिल्हाधिकारी श्री . मिलिंद शंभरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी ( महाराज ), अॅड मुनिनाथ कारमपुरी, गणेश म्हंता, बिपीन साबळे, युवक पेंनतरचे मारथा आसादे, शोभा गायकवाड , रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सुबोध वाघमोडे, सोहेल शेख, बहुजन असंघटीत कामगार आघाडीचे मनोज ऐकमल्ले, प्रतिभा ऐकमल्ले ( काटे ), बांधकाम कामगार गृहनिर्माण संस्थेचे गणेश बोडु, शमीम जमादार, आदि उपस्थितीत होते .
सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या बोगस बांधकाम कामगारांची सखोल चौकशी करा. यामागणीसाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना कामगार संघटनाचे प्रतिनिधी विष्णु कारमपुरी ( महाराज ) व मुनिनाथ कारमपुरी, सुबोध वाघमोडे, मनोज ऐकमल्ले, प्रतिभा काटे, गणेश बोड्डु, शमीम जमादार, मारथा आसादे, शोभा गायकवाड, सोहेल शेख आदि दिसत आहेत .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.