महावितरण विभागामध्ये उपकेंद्र सहाय्यक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल ॲप्रेन्टिस सर्टिफिकेट येत्या 8 दिवसात मिळणार




आमदार प्रणिती शिंदे यांची मा. ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत साहेब यांच्याशी झालेल्या चर्चेअंती निर्णय


सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्यातील महावितरण विभागातर्फे जाहिरात क्र. 05/2019 नुसार संपूर्ण राज्यामध्ये उपकेद्र सहाय्यक या पदाची भरती झालेली होती. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यासाठी नवी दिल्ली (NCVT) कडून घेण्यात येणारी ॲप्रेन्टिस परिक्षा पास होणे अत्यंत आवश्यक होते. त्यानुसार उमेदवारांनी ती परीक्षा उत्तीर्ण केली व त्यांना त्या परिक्षेचे उत्तीर्ण झालेले गुणपत्रक मिळाले परंतू उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट मिळाले नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती रखडलेली आहे. याबाबत सदर उमेदवारांच्या शिष्टमंडळानी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत साहेब यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा झाली असून याकरीता त्यांनी राज्यशासनाचा प्रतिनिधी पाठपुराव्याकरीता केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले व तसेच येत्या 8 दिवसात सदर उमेदवारांना नॅशनल ॲप्रेन्टिस सर्टिफिकेट येत्या 8 दिवसात मिळणार असे आश्वासन दिले. यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget