सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची सुधागड पाली येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली
या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकार समान पेन्शन पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची चौकशी कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला तात्काळ पन्नास लाखाची सरकारी मदत या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन
पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश संघटक पदी रायगड न्यूज चे पत्रकार व समाजसेवक राजेश मापारा यांची निवड करण्यात आली आहे
*यावेळी प्रदेश संघटक राजेश मापारा यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू तसेच कोकण विभागातील पत्रकारांच्या नक्कीच सोडवू त्यासाठी आंदोलन उभे करणार असे निवडी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले*
या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना कोकण विभाग अध्यक्ष गौसखान पठाण रायगड जिल्हा अध्यक्ष खलील सुर्वे जेष्ठ पत्रकार बाबा काशीद उपस्थित होते
नूतन प्रदेश संघटक राजेश मापारा यांच्या निवडीने कोकण विभागातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राजेश मापारा सारख्या युवा व धाडसी पत्रकार ची निवड झाल्याने पत्रकारांचे प्रश्न नक्कीच सुटतील अशी अपेक्षा अनेक पत्रकारांनी व्यक्त केली असून
त्यांच्या निवडीचे राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, सचिव प्रदीप रोकडे जालना जिल्हा अध्यक्ष गोपाल त्रिवेदी यांनी निवडीचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.