भारताचा आज 72वा प्रजासत्ताक दिन, देशभरात कडेकोट सुरक्षा




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

संपूर्ण देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड काढण्याचाही निर्णय घेतला आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाच्या सैन्याची ताकद पाहायला मिळणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी भारतीय हवाई दलात नव्याने सामील झालेली राफेल विमानही परेडमध्ये प्रात्यक्षिके करताना दिसतील. यासोबतच टी-90 टँक आणि सुखोई-30 एमके आय लढाऊ विमानंही या संचलनात सामील असतील.


सरंक्षण मंत्रालयकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे रथ पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सरंक्षण मंत्रालयाच्या सहा रथही यंदा परेडमध्ये असतील. निमलष्करी दलाचे 9 रथ राजपथावर संचलन करतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया मूव्हमेंटसारख्या अभियानांचे रथही पाहायला मिळतील.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget