सोलापूर // प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत रस्ता, पाणी, ड्रेनेज व लाईट या नागरी सुविधा व मुलभूत गरजाचे कामकाज पूर्ण झाल्यानंतरच सभासदाना ताबा देण्यात येईल अशी माहिती माँ साहेब विडी घरकुल संस्थेचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी कामगारांचा बैठकीत बोलतांना दिले.
माँ साहेब विडी घरकुल गृहनिर्माण संस्थेचा दक्षिण सोलापूर कुंभारी येथे केंद्र व राज्यशासनाचा अनुदानातून बांधण्यात आलेल्या विडी घरकुल ताबा देण्यासंबंधी सभासदाचे बैठक आयोजित करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विष्णु कारमपुरी (महाराज) तर पद्माताई म्हंता, श्रीनिवास चिलवेरी, दशरथ नंदाल यांची प्रमुख उपस्थितीत होता.
यावेळी बोलतांना अध्यक्षीय भाषणांत विष्णु कारमपुरी (महाराज) पुढे म्हणाले की, घरकुलांचा ताबा मिळावी म्हणून सभासदांनी करीत असलेले मागणी योग्य असून संस्था ताबा देण्यात तयार आहे. परंतु नागरी सुविधा पूर्ण झाल्याशिवाय ताबा दिल्यास कामगारांना राहण्यास गैरसोय होणार आहे. म्हणून लवकरात लवकर नागरी सुविधा व मुलभूत गरजा पूर्ण करुन घरांचा ताबा देण्यात येईल असे म्हणताना ताबा देण्यासाठी वेळ झाली ती कोरोना प्रादुर्भावामुळे एक वर्ष वाया गेले आहे असेही म्हणाले संस्थेचे विडी सदस्यांनी संमती दर्शविली. बैठकीचे प्रस्ताविक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले, पद्मताई म्हंता,यांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन विठ्ठल कुराडकर यांनी केले तर श्रीशैल वाघमोडे यांनीसुत्रसंचालन केले
सदर प्रसंगी विठ्ठल कु-हाडकर, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, श्रीशैल वाघमोडे, गणेश म्हंता, श्रीनिवास यनगंटी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, संजीव शेट्टी, शिवानंद येरटे, रामचंद्र गदगे, रमेश चिलवेरी, नरेश अन्नलदास, प्रशांत जक्का, नागार्जुन कुसुरकर, रमाबाई पंदिला, पार्वतीबाई पंदिला , अनिता बटगिरी , अर्चना चिलका , संध्याराणी कुन्हाडकर यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थितीत होते.
दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँ साहेब विडी कामगार घरकुल सभसदांना मार्गदर्शन करतांना संस्थेचे संस्थापक चेअरमन विष्णु कारमपुरी (महाराज) याप्रसंगी पद्माताई म्हंता, श्रीनिवास चिलवेरी , विठ्ठल कुऱ्हाडकर, अॅड. मुनिनाथ कारमपुरी आदि दिसत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.