सोलापूर // प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’ नागपूर संस्थेमार्फत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लक्ष्मी दत्तात्रय देवकर (उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम, ता. करमाळा) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त 3 जानेवारी 2021 रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वालचंद कॉलेज सोलापूरच्या नागराज राम मुळे याने द्वितीय तर निकिता रणजित शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 10 हजार, पाच हजार आणि अडीच हजार रूपये आणि प्रमाणपत्राचे वाटप समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अधीक्षक राहुल काटकर, विकास राठोड, मल्लिकार्जुन मळगे, रोहिणी लवटे, उमेश पुजारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.