बहुजन सत्यशोधक संघ यांच्या वतीने मंगळवेढा येथे तातडीची महिला मीटिंग घेण्यात आली.

 



सोलापूर // प्रतिनिधी 

मिटिंग चे अध्यक्ष -- मा. गणेश देवकते युवा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही मिटिंग संपन्न झाली. त्या वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप परकाळे , युवा सचिव मा. काशीलिंग रणदिवे आणि सर्व स्तरावरील महिला उपस्थित होत्या. त्यावेळी महिलांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यावेळी मा. गणेश देवकते बोलताना म्हणाले इमारत बांधकाम कल्याणकारी योजना चालू आहेत, कोणत्याही अफवांनर विश्वास न ठेवता ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावा. बहुजन सत्यशोधक संघातर्फे  ऑनलाइन नोंदण्या सुरू आहेत, अश्या विविध योजना गोर- गरीबां परेंन्त पोहचवण्याचे काम गेले कित्येक  महिन्यापासून बहुजन सत्यशोधक संघ करत आहे. तरी लोकांनी घाबरून न जाता आपल्या नोंदण्या करून घ्याव्यात बहुजन सत्यशोधक संघ कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम करेल असे सांगण्यात आले.लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व सामन्य जनतेच्या हाताला कामं नसल्यामुळे वाढीव लाईट बिले,पाणीपट्टी,घरपट्टी,नळपट्टी शासनाने माफ कराव्यात, अश्या मागण्या करण्यात आली, जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बहुजन सत्यशोधक संघातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा जिल्हाध्यक्ष मा.गणेश देवकते यांनी दिला. तसेच जिल्हाध्यक्ष मा.प्रदीप परकाळे यांनी महिलांना मागदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले मायक्रो फायनान्स कंपनीचे हप्ते जबरदस्तीने वसुली करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी मा.शंभरकर साहेबांनी सांगून देखील हे फायनान्स वाले लोक घरी येऊन तगादा लावत आहेत आणि महिलांना भीती घालत आहेत तुमचं सिव्हिल खराब करु, तुमचे आधार कार्ड ब्लॉक करू, पॅन ब्लॉक करू,तुमच्या घरातल्या वस्तू जप्त करू,तुमच्या आकाउंटला लाल शेरा मारू,तुम्हाला कोणतीच बँक कर्ज देणार नाहीअश्या तरेन महिलांना भयबीत केलं जातंय पण महिलांनी भयभीत होऊ नये कारण त्यांना असा कोणताच अधिकार नाही रिजर्व बँकेच्या निमनुसार या सगळया फायनान्स बांधल्या गेलेल्या आहेत. शासनाचे आदेश मोडून हे फायनान्स वाले जबरीने वसुली करतात तरी त्यांचे लायसन रद्द करण्यात यावे व जे कोणी वसुली ला येतं आहेत त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या. तसेच इमारत बांधकाम योजना गेले दोन वर्षे बहुजन सत्यशोधक संघ प्रामाणिक पने लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे,लोकांना त्याचा लाभ भेटत आहे, आणि ही योजना गोर गरीब मजुरांच्या हक्काची आहे व ती मिळवून देण्यासाठी बहुजन सत्यशोधक संघा मार्फत नोंदणी अभियान चालू करण्यात आले आहे,असे सांगण्यात आले.त्यावेळी मृणालिनी थिटे, पल्लवी थिटे,स्वाती गायकवाड,प्रियंका गायकवाड,स्वाती पवार,अनिता गुंगे,जसमीन दरवाजकर,अक्कुबाई मुढे, सुरेखा पवार ,अंबिका जाधव,स्वाती सुरवसे मोट्या संख्येने महिला उपस्थित होत्या. जिल्हा युवा सचिव काशीलिंग रणदिवे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget