ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते १.९४ कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन




भोकर शहर व तालुक्यातील या विकासात्मक कामांच्या भूमिपुजना निमित्त २२ जानेवारी रोजी मोंढा मैदान भोकर येथे होत आहे जाहीर सभा व आभार सोहळा


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

जिल्यातील भोकर शहर व तालुक्यातील १.९४ कोटीच्या विविध विकासात्मक कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत आज दि.२२ जानेवारी २०२१ रोजी साजरा करण्यात होणार आहे.


महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने राज्यास पुनश्च एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने भोकर तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लागत असून त्या कामांचा भूमिपूजन सोहळा दि.२२ जानेवारी २०२१ रोजी साजरा करण्यात येत आहे.या प्रसंगी भोकर शहर व तालुक्यातील १.९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत होणार असून या औचित्याने सायंकाळी ४:०० वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर जाहीर सभा आणि आभार सोहळा होणार आहे.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर,जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे,जि.प.गटनेता प्रकाश देशमुख भोसीकर,माजी सभापती नागनाथ घिसेवाड,पं.स.सभापती निता रावलोड,कृ.उ.बा.स.संचालक सुभाष पाटील किन्हाळकर यांसह आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


*विविध विकास कामांचे भूमिपूजन*…


हादगाव,तामसा,भोकर,उमरी,कारेगाव,लोहगाव,रस्त्याचे पेवर शोल्ड सह दुपदरीकरण करणे,भोकर मधील विश्रामग्रहाचे विस्तारीत बांधकाम,मुदखेड भोकर रस्ता क्र. १६१(अ)सुधारणा करणे,भोकर शहरासाठी वळण मार्गाचे बांधकाम करणे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासकीय इमारतीचे बांधकाम,भोकर येथे १८०० मे. टन क्षमतेच्या नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम,भोकर नगर परिषद विविध विकास योजनेअंतर्गत १४ कोटी ची कामे,अशा विविध विकासात्मक कामांचा शुभारंभ होणार असून सायंकाळी ४:०० वाजता मोंढा मैदान भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड.शिवाजी कदम,शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल पवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष रमीजोद्दीन ( खाजु ) इनामदार,उपसभापती गणेश राठोड,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,साहेबराव सोमेवाड,गोविंद बाबागौड पाटील,शेख युसुफ,उपसभापती नागोराव कोठूळे यांनी केले आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget