सोलापूर // प्रतिनिधी
टाकळी सिकंदर सह आजूबाजूच्या 52 गावांची आर्थिक वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा गळीत शुभारंभ चेअरमन तसेच संसद रत्न खासदार श्री. धनंजय महाडिक यांचे लंडन ईकॅनॉमिक स्कूल येथून बिझनेस मॅनेजमेंटचे ऊच्च पदवी शिक्षण घेऊन परतलेले चिरंजीव श्री. विश्वराज महाडिक व व्हाईस चेअरमन श्री. सतीश जगताप यांच्या शुभ हस्ते मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाला.या नवीन प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन पाच हजार टन एवढी आहे. गेली पंचवीस वर्षे या विस्तारीकरण प्रकल्पाची भीमा कारखान्याचे सभासद आतुरतेने वाट पाहत होते. कारण या परिसरातील अतिरिक्त उसाचा प्रश्न वरचेवर गंभीर होत गेला होता. श्री.धनंजय महाडिक यांनी कारखान्याची सत्ता काबीज करण्यापूर्वी निवडणुकीच्या जाहीरनाम्या मध्ये सदर विस्तारीकरण व को- जनरेशन प्रकल्प पूर्ण करण्याविषयी आश्वासन दिले होते, त्याची आज "वचनपूर्ती" झाली. कारखान्यासमोर दर एक वर्षानंतर आलेल्या दुष्काळासारख्या संकटांमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास थोडासा विलंब झाला व लांबलेल्या कालावधीच्या व्याजाचा अतिरिक्त ताण संस्थेवर आल्यामुळे कारखान्याला मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले होते. परंतु चेअरमन श्री.धनंजय महाडिक यांनी शासन दरबारी अथक् प्रयत्न करून कारखाना प्रशासनापुढील जवळ जवळ सर्व प्रश्न सोडवत आणले असून विस्तारीकरणाच्या शुभारंभमुळे भीमा कारखान्याचे सर्व सभासद,कामगार तसेच वाहतूक तोडणी कामगार व कंत्राटदार या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सूर्यकांत शिंदे , चीफ इंजिनियर आसबे,मुख्य शेती अधिकारी श्री. पाटील,ऑफिस सुपरिंटेंडंट भाऊसाहेब जगताप, केमिस्ट् पडळकर व कारखान्याचे सर्व विभागातील कामगार यांनी विशेष परिश्रम घेतले.
पुढील काही दिवसात 25 मेगावॅट क्षमतेचा विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू करणार असल्याचे व त्यातून कारखान्याला सुमारे 40 कोटी रुपयांचा नफा होऊ शकणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. शिंदे यावेळी स्पष्ट केले.
कामगारांचे अभिनंदन! लवकरच आसवनी प्रकल्प हाती घेणार!
- विश्वराज महाडिक
कारखान्याच्या इतिहासातील हा " सोनेरी क्षण " आहे . दोन्ही प्रकल्प परिश्रम घेऊन यशस्वीपणे पूर्ण केले म्हणून मी कारखान्याच्या अधिकारी वृंदाचे व सर्व कामगारांचे मनापासून आभार मानतो व अभिनंदन करतो व ह्यापुढेही आमचा लवकरच आसवनी प्रकल्प हाती घेऊन कारखान्याच्या नफ्यामध्ये वाढ करुन सभासदांच्या ऊसाला विक्रमी दर देण्याचा मानस आहे व या कामी मला आपणा सर्वांची आपणा सर्वांची मोलाची साथ हवी आहे! " असे सूतोवाच श्री. विश्वराज महाडिक यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. सतीश जगताप, श्री शिवाजीराव गुंड पाटील, प्रा. संग्राम चव्हाण,श्री. सुनील चव्हाण, श्री.राजेंद्र बाबर,श्री.भारत पाटील श्री.धनंजय देशमुख पैलवान अन्सार भाई, पैलवान जाकिर मुलाणि, सज्जन पवार ,नानासाहेब पवार ,माणिक बाबर व इतर मान्यवर सभासद उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.