एक आठवणीतील तपास दिवसा घरफोडी करणारे आरोपी





सोलापूर // प्रतिनिधी 

भर दिवसा येऊन हेरगिरी करून बंद घराचे लॉक तोडून चोरी करणारी टोळी. 

घरफोडी चोरी झाली की, आपल्याला मुख्यता रात्री आरोपी येऊन घरफोडी करतात असे वाटते, पण ही टोळी फक्त दिवसा घरफोड्या करते.

 ज्या सोसायटी मध्ये वॉचमन नाहीत, अशा सोसायटी यांचे मुख्य टार्गेट असते.

सदर तपासातील मुख्य clue म्हणजे सी.सी.टी.व्ही. (C.C.T.V.) फुटेज. 

घरफोडी घटनास्थळावरील तसेच जाण्यायेण्याच्या मार्गावरील सी.सी.टी.व्ही. (C.C.T.V.) फुटेज चेक करून डीटेक्शन (detection) ची चिकाटी न सोडता, आम्ही सर्व clue तपासले, सर्वच clue येथे सांगता येणार नाहीत, पण त्यातून आम्हाला मिळणारी प्रत्येक पॉझिटिव्ह माहिती आम्ही पडताळून पाहिली,  आणि आम्ही आरोपीस अटक करण्यात यशस्वी झालो. 

दुसरे महत्वाचे काम होते, गुन्ह्यातील माल हस्तगत करणे, आम्ही तपास पथकाने सोलापूर पासून १६०० की.मी. (1600 k.m.) दूर असलेले  गाझियाबाद, उत्तरप्रदेश मध्ये जाऊन ते आव्हानही यशस्वी रित्या पेलले, आणि चार दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात यश आले. 

खरोखर हा एक कौशल्यपूर्णरित्या केलेला आठवणीतील तपास आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget