सरपंच आरक्षणाची सोडत कधी?

 


राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.


यावेळी हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे. नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे, असं हसन मुश्रीफ म्हणाले खर तर निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget