राष्ट्रीय अध्यक्ष मचिंद्र भोसले यांच्याच हस्ते दिले नियुक्ती पत्र
पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील धाडशी युवा नेतृत्व आणि शिवसेनेचे विभागप्रमुख उमेश अजिनाथ काळे यांची रविवार दि17 जानेवारी रोजी पंढरपूर तालुका भटक्या व विमुक्त जाती संघ मुंबईच्या संघटकपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले. या निवडीचे पत्रही मंगळवेढा येथे राष्ट्रीय अध्यक्ष मछिंद्र भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.
उमेश काळे हे बहुजन समाजातील एक तळमळीनं काम करणारे नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या मागील कामाची दखल घेऊन भोसले यांनी या शाहू, फुले, आंबेडकरी विचाराने वाटचाल करीत असलेल्या वरील संघटनेचे तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र देताना श्रीमंत चव्हाण, भगवान इंगोले, महादेव भोसले, सुरेश पवार, नारायण इंगोले, सुरेश हेगडकर, भैरू भोसले, शाम चव्हाण, दादाहरी चव्हाण, सौ फुलाबाई भोसले, शेवंताबाई चव्हाण, मारुती शिंदे, राणी भोसले, ड्रा शिवाजी भोसले, यांच्यासह भटक्या व विमुक्त जाती संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते,
उमेश काळे यांच्या या निवडीबद्दल पंढरपूर तालुक्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.