सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन तसेच सोलापूर जिल्हा प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच खुश होऊन आज सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ सचिव श्रीधर लोंढे यांनी व बार्शी येथील ओंकार हिरेमठ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर जिल्हा मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर (काका) कुलकर्णी उपजिल्हा अध्यक्ष अमोल झाडगे, अक्षय आडम, गोविंद बंदपट्टे हे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.