श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस १लाख रुपयांची देणगी



पंढरपूर // प्रतिनिधी 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस १लाख रू. देणगी. पंढरपूर(प्रतिनिधी) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास श्री विवेक रामदास सक्करवार (रा.५बी, वेदांतनगर, प्राईड टॉवर, औरंगाबाद)यांनी आज रविवार दि १७जानेवारी रोजी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्री ची प्रतिमा, उपरणे,हार,श्रीफळ देऊन सक्करवार यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी, देणगी प्रमुख संजय कोकीळ व सर्व कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी पाडव्यापासून मंदिर उघडण्यात आले. सुमारे८महिने कोरोना संकटामुळे मंदिर बंद करण्यात आले होते. यामुळे भाविकांना येता येत नव्हते. आता संक्रांत सण व कोरोनाचे भय कमी झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget