पंढरपूर नगरपरिषदेतील विविध समितीच्या सभापती पदी नव्या निवडी

पंढरपूर नगरपरिषदेतील विविध समितीच्या मुदत संपल्याने आज नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिपत्याखाली विविध समितीच्या सभापतींची निवड व समिती सदस्यांची निवड करण्यात आली यावेळी भाजप,पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर व तीर्थक्षेत्र विकास आघाडी व काँग्रेस चे गटनेते सुधीर धोत्रे,सुरेश नेहतराव यांनी समितीच्या सदस्य व सभापती निवडीबाबतचे पत्र पीठासीन अधिकारी यांच्याकडे सादर केले.

 यावेळी बांधकाम समितीच्या सभापती पदी सुरेश वसंत नेहतराव, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी संजय चंद्रकांत निंबाळकर, आरोग्य समितीच्या सभापती पदी विक्रम लक्ष्मण शिरसट, शिक्षण समितीच्या सभापती पदी शकुंतला विजय नडगिरे, महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदी मालन भगवान देवमारे, उपसभापती पदी भाग्यश्री देवेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समितीच्या सदस्य पदांची निवड करण्यात आली तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी दगडु नारायण धोत्रे, अक्षय प्रताप गंगेकर व प्रशांत गणपत शिंदे यांची निवड करण्यात आली.सदरची निवडणूक पार पाडण्याकामी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर सभा लिपिक लक्ष्मीकांत कोटगिरी यांनी काम पाहिले.

यावेळी नगरसेवक उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, वामनराव बंदपट्टे व सर्व नगरसेवक व आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget