वृत्तसंस्था // प्रतिनिधी
खरीप हंगाम 2020-21 मध्ये उत्पादित मका खरेदी शासनाने हमीभावाने कुर्डूवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू केली होती परंतु केंद्र शासनाने बंद करण्यास सांगितले तेंव्हा मका खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता परंतु आता शासनाने पुन्हा एकदा ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी हमीभावाने सुरू होणार असून 31 जानेवारी पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
कुर्डुवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 712 शेतकऱ्यांनी मक्याची नोंदणी केली होती त्यापैकी 170 शेतकऱ्यांच्या 3662 क्विंटल मका हमीभावाने खरेदी केली होती उर्वरित 542 शेतकऱ्यांकडील 12452 क्विंटल मका खरेदी शिल्लक आहे अशा राहिलेल्या शेतकऱ्यांचीही मका खरेदी करावी यासाठी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती
राज्य शासनाने या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे केंद्र सरकारने मका व इतर धान्य खरेदीस
मंजुरी मिळाल्याचे अन्न व नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे त्यामुळे किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजने अंतर्गत मका खरेदीसाठी मान्यता मिळाली आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.