टाकळी सिकंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये संसदरत्न खा.धनंजय महाडिक ग्रामविकास पॅनेलचे पारडे जड!




सोलापूर // प्रतिनिधी 

भीमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये असणारे सर्वात मोठे गाव म्हणजे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखाना आहे. या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये टाकळी सिकंदर हे संपूर्ण मोठी ग्रामपंचायत असलेले एकमेव गाव आहे.

मोहोळ तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून या गावाकडे ओळखले जाते या गावांमध्ये  खासदार धनंजय महाडिक यांचे फार मोठे वर्चस्व आहे. या गावातच भीमा सहकारी साखर कारखाना सुद्धा आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागले असून या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संसद रत्न खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलने प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारली असून या पॅनल मध्ये भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा संग्राम चव्हाण सर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण, हिम्मत दादा पाटील संजय उर्फ बंडू यादव, कारखान्याचे संचालक, बापुसाहेब (फौजी) नारायण चव्हाण, यांच्या सर्व पॅनेलने जोरदार आघाडी घेतली आहे. यामध्ये भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.

 संग्राम चव्हाण सर यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्याचबरोबर त्यांनी या निवडणुकीमध्ये विरोधकांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी पूर्ण तयारी केली असल्याचे चित्र टाकळी सिकंदर गावामध्ये दिसत आहे.


ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजपर्यंत केलेली सर्वतोपरी विकास कामे सर्व गोरगरीब नागरिकांना दिलेला न्याय व वंचित व बहुजन समाजासाठी राबवलेल्या विविध उपायोजना यामुळे संसद रत्न खासदार धनंजय महाडिक पॅनेलला यावेळी संपूर्णपणे बहुमत मिळेल असे भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा. संग्राम चव्हाण सर यांनी सांगितले.

(विरोधक फक्त आणाभाका करीत असून विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी एकही जन पुढे येताना दिसून येत नाही)

ही ग्रामपंचायत अत्यंत एकाकी वाटत असून प्रचाराची रणधुमाळी संपताना संसदरत्न   खा.धनंजय महाडिक, पॅनलचे वर्चस्व दिसून येत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget