सुस्ते ग्रामपंचायत विजय ऐतिहासिक! विजयी उमेदवारांचा मा.खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते जंगी सत्कार!

 



सोलापूर // प्रतिनिधी 

श्री अंबिका महाविकास परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला.

 सत्कार समारंभाला प्रसंगी  श्री.अंबिका महा विकास परिवर्तन आघाडीचे सर्व आठ उमेदवार भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उपस्थित होते. यावेळी खा. महाडिक म्हणाले की सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास साधावा व ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवुन पंढरपूर तालुक्यांमध्ये हे एक आदर्श निर्माण करावा.  काही जर कमी पडले तर मला अवश्य सांगा,मी सदैव आपल्या मदतीसाठी हजर असेन! 

                 यावेळी शिवाजीराव गुंड पाटिल, भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप,भिमाचे संघटक समन्वयक

 प्रा. संग्राम चव्हाण, सर ,पुळुजचे पांडुरंग ताटे, राजाराम बाबर, भारत पाटील, भिमाचे संचालक बिभिषण वाघ,  भीमाचे संचालक तुषार दादा चव्हाण, तानाजी भाऊ चव्हाण, तात्या मामा नागटिळक, एस के चव्हाण सर, सप्तशृंगी पतसंस्थेचे अतुल भैय्या चव्हाण, रामदास (बापू) चव्हाण, माधव (बापू) चव्हाण, आनंता दादा चव्हाण,बालाजी नागटिळक, पांडुरंग कदम,यशवंत (बंडु) चव्हाण,महादेव गावडे,धनंजय घाडगे, विजय नागटिळक, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, संतोष सुळे, गणेश बोबडे, एस.के. चव्हाण सर, संजय चव्हाण, संभाजी चव्हाण, अमोल चव्हाण, तानाजी शिंगण, अजिंक्य वाघमारे, संजय लोखंडे, आनंदा चव्हाण, विकास चव्हाण, मुकुंद चव्हाण, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, देविदास वाघमारे, दत्तात्रेय वायदंडे, संजय रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, मसु वाघमारे, आदि प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुस्ते येथील विजयी उमेदवार विठ्ठल-भीमा परिवार पॅनल मधून राणी चव्हाण, विष्णू गावडे, स्नेहा बोबडे, उर्मिला चव्हाण, नंदाबाई वायदंडे, तुषार चव्हाण, जुबेदा शेख, कांताबाई रणदिवे हे उमेदवार विजयी झालेले सर्व उमेदवार यावेळी खा. महाडिक यांची भेट घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित होते.यावेळी सर्व युवक कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.





चौकट 

पंढरपूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सुस्ते ग्रामपंचायतीमधे महाडिक गटाचे पॅनल तब्बल  ४० वर्षानंतर निवडून आल्यामुळे मला खूप आनंद  झाला आहे. जिद्दीने ने काम करून  हा विजय संपादन केल्याबद्दल मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. आज भीमरावदादा असायला पाहिजे  होते, मी हा विजय स्वर्गीय भीमरावदादा यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करतो असे भावविवश उद्गार श्री महाडिक यांनी काढले. ग्रामपंचायतीच्या सर्व नूतन सदस्यांना मी मनापासुन शुभेच्छा देतो व  सर्व सदस्यांनी एकदिलाने काम करून गावाचा विकास साधावा असे आवाहन  त्यांनी यावेळी बोलताना केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget