भाजप जिल्हा संघटक सरचिटणीसपदी मोहिते-पाटील यांची एकमताने निवड!

 


(भाजपला अधिकचे बळ मिळणार)


सोलापूर // प्रतिनिधी 

भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांची प्रदेश नियुक्त माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीस पदी व सोलापूर लोकसभा संघटक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. 


सांगोला येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरत्न शिक्षक संस्था व शिवामृतचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील यांची प्रदेश नियुक्त माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीसपदी निवड केली. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजा राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 


गत लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते - पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मोहिते - पाटील यांच्या प्रवेशामुळे माढा मतदार संघात प्रथमच भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले होते. या निवडणूकीत खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना माळशिरस तालुक्‍यातून दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्‍य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजाप आमदार राम सातपुते यांना निवडून आणले होते. नुकत्याच झालेल्या माळशिरस तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अकलूजसह अनेक ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget