सोलापूर // प्रतिनिधी
हरिभाई देवकरण प्रशालेत महात्मा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अनुदानाचा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे तक्रार महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी माननीय समाज कल्याण अधिकारी यांना दि. २५/११/२०२० रोजी निवेदनाद्वारे दिले. याची चौकशी न करता समाज कल्याण अधिकारी हे वारंवार चालढकल करीत आहेत. यावरुन हरिभाई देवकरण प्रशालेत झालेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात समाज कल्याण अधिकाऱ्याचेही हीतसंबंध असल्याचे दिसून येते असा घणाघाती आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केला आहे.
हरिभाई देवकरण प्रशालेतील सन २०१३ - १४ यासाली अनुसुची जाती - जमाती व मागासवर्गीय यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले महात्मा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अनुदान अद्यापी मिळाली नसल्याचे काही विद्यार्थ्यांनींनी कामगार सेना कार्यालयात तक्रार नोंदविले. त्यावरून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दि. २५/११/२०२० समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांना सदर प्रकरणाबाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाबाबत समाज कल्याण अधिकारी यांनी सदर प्रकरणी कुठलीही चौकशी करीत नाहीत . कामगार सेनेचे प्रतिनिधी सदर प्रकरणाची चौकशीबाबत विचारण्यास गेले असता वारंवार चौकशी चालु आहे. असे उत्तर देतात. आणि ये प्रकरण आमच्या कार्यालयाशी संबंध नाही असे देखील म्हणतात. यावरुन हरिभाई देवकरण प्रशालेत सन २०१३-१४ साली व तत्पुर्वी महात्मा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अनुदान घोटाळ्यात समाज कल्याण अधिकारी यांचेही हात असल्याचे दिसून येते. म्हणजेच शिष्यवृत्ती घोटाळा प्ररणात समाजकल्याण अधिकारी समीन आहेत असा आरोप विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे आणि याबाबत दाद मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.