सोलापूर // प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे संसद रत्न खासदार भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील मा.खा.धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांचे खंदेसमर्थक श्री यशवंत (बंडू) मोहन चव्हाण यांनी एक अनोखी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी पंढरपूर येथील सुप्रसिद्ध फोटो फ्रेम मेकर अवधूत बडवे यांच्याकडून साहेबांचा वहिनी साहेबांचा फोटो कलाकृतीने तयार करून कोल्हापूर येथील खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी देऊन यांना सप्रेम भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी खा.धनंजय महाडीक यांनी या अनोख्या भेटीचे अंतकरणातून कौतुक करत ते म्हणाले की;महाडीक कुटुंबियांवर सर्वच जण मनापासून प्रेम करतात परंतु अशा प्रकारे अशी अनोखी भेट आजपर्यंत कोणीही दिली नाही. मी आपला ऋणी आहे असे म्हणत विशेषत: कलाकृती केलेल्या प्रतिमेची तोंडभरून कौतूक केले व त्यांनी यशवंत (बंडु)चव्हाण यांचे मनभरून आभार मानले.
या भेटीवेळी श्रीमती मंगलताई महाडीक,खासदार.धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडीक व त्यांच्या सुविद्यपत्नी भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूंधतीताई धनंजय महाडीक, यशवंत मोहन चव्हाण,सौ.रेश्मा यशवंत चव्हाण,आर्यन यशवंत चव्हाण, नरेंद्र माने,सौ.मेघा नरेंद्र माने व सर्व चव्हाण कुटुंबीय या भेटी प्रसंगी उपस्थित होते.
चौकोट:-
संसद रत्न खा. मा. धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्यासारखे दिलखुलास व्यक्तिमत्व सोलापुर,सांगली,कोल्हापुर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शोधून सापडणार नाही त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेल असे सरस काम त्यांनी आजपर्यंत सर्वस्तरातून केले आहे. व करत आहेत त्यांच्या या कार्याला व कार्यपध्दतीला माझा मानाचा मुजरा
-यशवंत (बंडू) चव्हाण सुस्ते


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.