पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांसाठी कशल्याही प्रकारचे राजकारण मी करणार नाही:- आ.यशंवत तात्या माने




(विकास कामाबाबत विनोद (भैया) महाडिक यांच्या सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल!)


सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ पंढरपुर मतदारसंघातील 17 गावातील विकास कामे करताना कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नाही. या गावातील रस्ते, विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.



पुळुज (ता.पंढरपूर) येथील आ. यशवंत माने यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले , यावेळी ते बोलत होते. हेवी शहीद जवान मस्के यांच्या सभामंडप रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आली अध्यक्षस्थानी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव पाटील होते.


यावेळी आ. यशवंत माने म्हणाली की,17 गावातील विकास कामाला माजी आमदार राजन पाटील, विनोद महाडिक कल्याण रोड पाटील यांच्या सल्ल्याने प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच कोरोनायोद्धा म्हणून काम केलेली डॉक्टर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर, मदतनीस यांचा सत्कार केला. यावेळी अजिंक्यराणा पाटील, कल्याणराव पाटील, विनोद माने यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तुकाराम बंडगर, मुबिना ताई मुलाणी, सरपंच स्वाती शेंडगे, पोलीस पाटील आनंद पाटील, उपसरपंच विनायक पाटील, राजू गावडे, अंबादास बाबर, युवराज शिंदे, धनाजी देशमुख, महेश कांबळे, लिंगा निळगुंडी, शिवाजी लोमटे, संदीप देवकते, अण्णा शेंडगे, तानाजी होनमाने, बंडू बाबर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी शेंडगे यांनी केले. आर.पी. कोळी यांनी आभार मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget