सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिति हि ठाणे जिल्ह्यात अत्यंत शिताफीने एक वर्षापासून ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे व सरचिटणीस प्रदिप गोविंद रोकडे यांच्या सहकाऱ्यांना घेऊन उत्तम काम करत आहे. पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकार समान पेन्शन, पत्रकारांवरील दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी,करोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला तात्काळ पन्नास लाख रुपये मदत , राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, तसेच युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता मिळावी अशा अनेक विषयावर समितीची कामे सुरू आहेत. ठाणे, रायगड, तसेच कोकण विभागातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे, आणि सोलापूर शहर उपाध्य्क्ष बिपिन दीड्डि यांचा दौरा शनिवार व रविवार संपन्न झाला. यादरम्यान ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, सरचिटणीस प्रदिप गोविंद रोकडे, बदलापूर शहर अध्यक्ष भरत कारंडे, जाफर वनू, दिनानाथ कदम, उल्हासनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई, यांच्या सोबत आदिवासीं पाडा, ग्रामीण पत्रकार, यांच्या समस्या जाणून घेतल्या. पनवेल येथील विश्रामगृहात बैठक घेऊन निर्भीड पत्रकार संघाच्या अध्यक्षा सौ. रुपाली मलबारी यांच्याशी पत्रकारांच्या विषयी चर्चा करून संघटना कार्याची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार केला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.