सोलापूर // प्रतिनिधी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप हंगाम 2020-21 मध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथे दि.15 जानेवारी,2021 अखेर गाळप झालेल्या संपूर्ण ऊसाचे प्र.मे.टन रू.2000/- प्रमाणे ऊस बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खातेवर जमा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 गळीत हंगाम चालू असून या हंगामामध्ये आजअखेर युनिट नं.1 पिंपळनेर येथे 11 लाख 66 हजार 363 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11 लाख 01 हजार 50 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. तसेच युनिट नं.2 करकंब येथे 3 लाख 14 हजार 868 मे.टन ऊसाचे गाळप होवून 3 लाख 26 हजार 300 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. या हंगामामध्ये युनिट नं.1 व 2 कडे 15 जानेवारी अखेर गाळप झालेल्या ऊसासाठी प्र.मे.टन रू.2000/- प्रमाणे पहिले ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आलेले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने वेळेत ऊस बील अदा करणेची परंपरा कायम ठेवत ऊस बिलाचे पेमेंट ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर वर्ग केले असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. ऊस पुरवठादार शेतक-यांनी प्रतिवर्षी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्यास सहकार्य केलेले असून हा गाळप हंगाम देखील यशस्वी करण्यासाठी ऊस पुरवठादारांनी सहकार्य करावे असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.