फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यानाचे आयोजन




सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाने जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा घोषित केला आहेयाचे औचित्य साधून फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या अभियांत्रिकीपॉलिटेक्निकफार्मसीज्युनिअर कॉलेज   फॅबटेक पब्लिक स्कूल या सर्व विद्याशाखेमध्ये  जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा  साजरा करण्यात आलाकार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रासुनील नष्टे यांच्या हस्ते विद्देची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आलीया कार्यक्रमासाठी  प्रासुनील नष्टे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होतेत्यांचा सत्कार अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉआरबी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

      महाविद्यालयात निबंध  वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३८ विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेत स्नेहल संग्राम बाबर हिने प्रथम क्रमांक तर रेश्मा देशमुख हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत सौरभ आयवळे प्रथम तर  गीतांजली आयवळे व वैभव साळवे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र  वितरण करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी भाषेतील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होतेप्रासुनील नष्टे म्हणाले कि,  भाषा ही संस्कृतिवाहक आहेग्रामीण भाषा ही जोपासली पाहिजे. आपल्या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे, विद्यार्थांनी आपल्या शैक्षणिक पदवीबरोबरच चांगुलपणाचेही सर्टिफिकेट घेऊन जावे. माता, माती, आणि मातृभाषा हे तीन घटक आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत. मराठी भाषेमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भावना आहे. विद्यार्थांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत, कसे जगावे हे मराठी भाषा शिकविते, जगण्यातले सौन्दर्य मराठी भाषा शिकविते. असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाने स्वभाषीक असावे, माणसाने माणूसपण जपले पाहिजे. मराठी भाषेचे सार व महत्व त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर विशद केले.

   या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते.  हा कार्यक्रम कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी मेडशिंगी गावचे माजी सरपंच जालिंदर माने, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक डीन प्राटीएन.जगताप, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अमोल मेटकरी, प्रा. संगीता खंडागळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली मेटकरी हिने केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget