गादेगांव च्या युवकांनी वाचवले राष्ट्रीय पक्षाचे प्राण

 



सोलापूर // प्रतिनिधी 

माणसांच्या वेदना माणूस जाणू शकतो, व्यक्त करु शकतो. परंतु इतर सजीवांच्या बाबत तसे होत नाही. याउलट माणसाच्या विज्ञानवादी, आधुनिकीकरणाच्या भूमिकेमुळे अनेक सजीव जीवांना नाहक आपले जीव गमवावे लागत आहेत. परंतु अशा या जगात वन्यप्रेमी, पक्षीप्रेमी, समाजसेवक आजही आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.


आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे याचा ही आज बर्याच जणांना विसर पडला आहे. गेल्या दोन दिवसापासून गादेगांव परिसरात लिंबारा, शिवरस्ता येथे एक मोर दुखापतग्रस्त होऊन एकाच जागी थांबला होता. याची माहिती ज्यावेळी वृक्षमित्र दत्ता बागल व गणेश बागल यांना मिळाल्यानंतर त्यांनी कष्ट करणारे प्राणी व बेवारस प्राणी, पशू पक्ष्यांसाठी कांम करत असलेल्या "अॅनिमल राहत" या संस्थेची मदत घेऊन दुखापतग्रसस्त मोराला वैद्यकीय उपचार मिळवून देऊन, अधिकच्या उपचार करिता पशू वैद्यकीय डाॅ. प्रल्हाद भिसे व त्यांचे सहकारी प्राणीमित्र माधवा पवार यांच्या स्वाधीन केले. यावेळी प्रशांत पाटील, विजय जाधव, सुरज शिंदे आदी उपस्थित होते. या तातडीच्या उपचारा व दक्षतेमुळे आपला राष्ट्रीय पक्षी मोर ला वाचवण्यात यश आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget