महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभाग सोलापूर शहर-जिल्हा अध्यक्षपदी तिरुपती परकीपंडला यांची निवड




सोलापूर // प्रतिनिधी 

भाजप तर्फे सोशल मीडियावर सुरु असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी, व आगामी काळात पक्षाचे ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘सोशल मीडियाच्या विभागाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष रोहन गुप्ता, काँग्रेस राष्ट्रीय सोशल मीडिया समन्वयक गौरव पांधी, यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अभिजित सपकाळ यांनी सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी तिरुपती परकीपंडला यांची निवड करण्यात आली असुन तसेच सोलापूर मध्य विधानसभा अध्यक्षपदी जयंत रच्छा, उत्तर विधानसभा अध्यक्ष सुनील सारंगी, दक्षिण सोलापूर विधानसभा अध्यक्षपदी निखिल टाकळी यांची निवड करण्यात आली.


नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोमपा गटनेते चेतन नरोटे, आदिनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget