चार हुतात्मा दिन निमित्त मा. सोलापूर शहर काँग्रेस वतीने चार हुतात्मा पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरचे चार हुतात्मा श्री मल्लाप्पा धनशेट्टी,  श्री जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, श्री अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1931 साली या चार स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा ब्रिटिश सरकार कडून देण्यात आली होती. कारण इतिहासात अशी एकमेव घटना आहे की सोलापूर ने भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वी 9 ते 12 मे 1930 हे चार दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते त्यात ह्या स्वातंत्र्यवीरांना फाशी देण्यात आली होती. म्हणून सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चार हुतात्मा दिनानिमित्त पार्क चौकातील चार हुतात्म्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, संध्याताई काळे, राहुल बोळकोटे, VD गायकवाड़, राजेश झंपले, पुरुषोत्तम श्रीगादी, दत्ता नामकर, हरीष गायकवाड़, शोभा बोबे, शैलेन्द्र पाटील, सौरभ सालुंखे, मेहमूद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget