१२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती विशेष

 



स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणा स्थान- प्रा.धनंजय कदम

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्‍न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र' असे ठेवले.

नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्‍हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?' नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.

१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना 'स्वामी विवेकानंद' म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे न संबोधता 'माझ्या

बंधु-भगिनींनो' असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.

स्वामी विवेकानंद यांचे विचार  आजच्या युवकांना प्रेरेनास्थान असलेले दिसून येत. भारता सारख्या राष्ट्रामध्ये  स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस १२ जानेवारी हा दरवर्षी 'राष्ट्रीय युवा दिन'(National Youth day) म्हणून साजरा केला जातो.

युवक हे देशाचे भविष्य असते असे मत स्वामी विवेकानंद यांनी मांडले होते.ज्या देशा मध्ये भ्रष्टाचार, वाईट घटना, सामाजिक अशांतता असे प्रकार घडत असतील तर त्या देशातील युवा शक्तीला जागृत करणे आवश्यक आहे असे विचार स्वामी विवेकानंद  यांनी त्यावेळी सांगितले होते.स्वामी विवेकानंद यांच्याकडे असणारे विचार आज ही युवकांना प्रेरणा देत असतात.या त्यांच्या अनमोल विचारा मध्ये एक अनोखी ऊर्जा आणि सकारात्मकता याचे दर्शन घडवून येते.जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अहंकार पासून दूर राहिले पाहिजे असे परखड मत त्यांनी मांडले होते. अशा प्रकारे बहुमोल विचार आजच्या युवकाला प्रेरणा दिल्या शिवाय राहू शकत नाहीत.

समस्त पाश्चात्त्य जगात विवेकानंदांची कीर्ती व भारताचा मान वाढला. अपूर्व सहनशीलता, असीम धैर्य, अलौकिक त्यागशक्ती यांचा सहज समन्वय म्हणजे स्वामी विवेकानंद ! ज्याने आपल्या देशाला आणि देशबांधवांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले, ते स्वामी विवेकानंद माझी आवडती विभूती आहेत. या महान विभूतीने ४ जुलै १९०२ या  दिवशी रात्री बेलूर या मठात महासमाधी घेतली. 

अशा या महान जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आपण आपल्या देशातील युवकांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणे जगामध्ये आपले विचार मांडण्याची बळ मिळो त्याच बरोबर आजचे तरुण दिवसेंदिवस बेरोजगारी, व्यसनाधीनता,नैराश्य आशा अनेक समस्या मधून मुक्ती मिळो आणि बल- शाली भारत होवो!एवढी एकच मापक अपेक्षा या निमित्ताने आपणा समोर ठेवतो. अशा या प्रसिद्ध स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget