ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त तीन दिवस मद्य विक्री राहणार बंद:- जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

 


सोलापूर // प्रतिनिधी 

जिल्ह्यामध्ये 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेच्यानिर्भय आणि नि:पक्षपाती वातावरणात व्हावीकायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेयासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री 14 जानेवारी (मतदानाचा अगोदरचा दिवस)15 जानेवारी (मतदानाचा दिवस) आणि 18 जानेवारी 2021 (मतमोजणीचा दिवस) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

            ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा-1949 नुसार कलम 142 अन्वये जिल्ह्यातील सर्व एफएल-1सीएल-2एफएल-2एफएलडब्ल्यू-2नमुना ई-2सीएल-3एफएल-3एफएलबीआर-2, एफएल-4 आणि तात्पुरती क्लब मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

            14 जानेवारी आणि 15 जानेवारीला संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री बंद राहणार असून मतमोजणीच्या दिवशी 18 जानेवारीला संपूर्ण दिवस 658 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्वाचन क्षेत्रीतील मद्यविक्री बंद राहतील. निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील विदेशी व दारू (वाईन) उत्पादक उत्पादन करू शकतीलमात्र मद्याचा पुरवठा करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.  

            मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहेअसे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget