माँ साहेब विडी कामगार वसाहतीतील मूलभूत सुविधेसाठी लवकरच निधी देणार:- मा.ना.हसन मुश्रीफ





सोलापूर // प्रतिनिधी 

दक्षिण सोलापूर कुंभारी येथील स्वर्गीय मिनाताई ठाकरे घरकुल वसाहतीस मुलभुत सुविधेसाठी निधी उपलब्ध करुन देणार अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या शिष्टमंडळाला दिली. 

           दक्षिण सोलापूर येथील मौजे कुंभारी येथे माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्वर्गीय मिनाताई ठाकरे विडी कामगार घरकुल वसाहतीत मुलभुत गरजा व नागरी सुविधा पुरविण्यासाठी मा. ना. श्री. हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दि. २३ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथील मंत्री महोदय यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वरील समस्या बाबत चर्चा केली. सदर प्रसंगी मा. मंत्री महोदय यांनी माँ साहेब विडी कामगार वसाहतीत मुलभुत गरजा व नागरी सुविधेसाठी लवकरच निधी देणार असे म्हणाले. 

            सदर प्रसंगी मा. ना. हसन मुश्रीफ साहेब, माँ साहेब विडी कामगार सेनेचे संस्थापक चेअरमन विष्णु कारमपुरी (महाराज), पप्पु शेख, शिवा ढोकळे, दिनकर पतंगे आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget