सोलापूर // प्रतिनिधी
शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला गेलेल्या महेश कोठे यांना तुर्तास थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज महेश कोठे यांच्या समर्थकांचा प्रवेश झाला. प्रवेशाबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व महेश कोठे यांच्यात उद्या (शनिवार) सकाळी 8 वाजता पुण्यात बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज दुपारी पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत कोठे समर्थकांना प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महिला अध्यक्ष सुनील रोटे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.