सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सेटलमेंट भागातुन वार्ड चलो अभियानाची सुरुवात



रामवाड़ी, सेटलमेंट, धोंडीबा वस्ती, सलगर वस्ती भागातील मतदारांचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही :- आ प्रणिती शिंदे

धनराज बलभीम गायकवाड़ यांची सोलापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड, भव्य सत्कार


सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर युवक काँग्रेस वार्ड चलो अभियानाची सुरुवात आज रोजी सेटलमेंट फ्री कॉलनी नं 2 येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी युवा नेते धनराज बलभीम गायकवाड़ यांची निवड झाल्याबद्दल त्यांना निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करुण त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस सेटलमेंट कॉलनी नं. 2 येथील शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हेमगड्डी प्रमुख उपस्थिती सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, जेष्ठ नेते गोपाळ नंदुरकर, नागेश (गवळी), गायकवाड़ प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मदन गायकवाड, विजय जाधव, अनिल अंबादास, गायकवाड, प्रकाश जाधव, देवा (भाऊ) गायकवाड, संतोष अट्टेलुर, विनोद जाधव, बलभिम गायकवाड, सुरजकुमार गायकवाड, विशाल (दादा) गायकवाड, सकलेश (पत्रकार) जाधव, संदीप (बाबू) गायकवाड, ज्ञानदिप जाधव, विकास गायकवाड, विकास जाधव, अतिश नंदुरकर, मयुर जाधव, अतित जाधव, ओम जाधव, सुभाष वाघमारे, अजित जाधव, कुणाल गायकवाड, सतिश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल जाधव, सोमनाथ जाधव, नागेश म्याकल, सागर गायकवाड, गिरीश जाधव, रोहित चैतन्य,  यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की आज युवक काँग्रेसच्या वतीने वार्ड चलो अभियानाची सुरुवात आपल्या भागातुन सुरु झाली आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांचे अडचणी जाणून घेऊन सोडविन्याच्या प्रयत्न करावा यासाठी आम्ही आणि काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहोत तसेच पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की सेटलमेंट, रामवाड़ी, धोंडीबा वस्ती, सलगरवस्ती हा भाग माझ्यासाठी कधीच नव्हता मी लहान असताना पासून या भागात माझ्या वडिलांच्या प्रचारासाठी येत होते. या भागातील जनतेने शिंदे साहेबांना, काँग्रेस पक्षाला व मला प्रचंड प्रेम, आदर, आणि पाठिम्बा दिला. तुमच्याच सहकार्यामुळे मी तिसऱ्यांदा आमदार झाले. या भागातील मतदारांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही या भागात आले की मी आमदार असल्यासारखे वाटत नाही मला वाटते की मी तुमचीच एक बहिण, एक मुलगी असुन या भागात आल्यास आपल्या घरी आल्यासारखे वाटते. नागरिकांनी सांगितलेले प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न केला. आणि यापुढेहि करणार आहे. या भागातील नागरिकांवर कुठला अधिकारी चुकीचे कारवाई करत असेल तर मी गप्प बसणार नाही. तसेच यावेळी धनराज गायकवाड़ यांना शुभेच्छा देत आपल्या पदाच्या, पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget