सोलापुरातील एलसीबीच्या पथकावर बारलोणीत दगडफेक; तीन पोलीस कर्मचारी जखमी




सोलापूर // प्रतिनिधी 

सांगोला येथील एका गुन्ह्याच्या घटनेतील संशियत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकावर बारलोनी (ता.माढा) येथे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान संशियताकडून दगडफेक करीत हल्ला झाला असून त्यात गुन्हे शाखेचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.        सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पोलिस शिपाई धनराज गायकवाड व चालक पोलिस शिपाई समीर शेख यांचे पथक सकाळी बारलोनी गावच्या हद्दीत तपासाच्या दिशेने पोहचले होते. तिथे पथक आल्याचे पाहून संबधीत आरोपींनी त्यांच्या सरकारी पोलीस गाडीवर हल्ला चढवित दगडफेक सुरू केली.यात त्यांच्या दगडफेकित पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हल्ला झाला तरी कुर्डूवाडी पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नव्हता. वरिष्ठांकडून कळल्यानंतर येथील पोलिसांनी धावपळ सुरू केली.तोपर्यंतसोलापूर ग्रामीण पोलिसांचे अधिकची पथके पुढील कारवाईसाठी बारलोनी गावात दाखल झाली आहेत.  घटनास्थळी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget