टाकळी सिकंदर ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये खूपच रंगत आली असून याठिकाणी तिरंगी लढत निश्चित झाली असून संसद रत्न मा.खा.धनंजय महाडिक ग्रामविकास पॅनलचा प्रचाराचा जोर दिसून येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून मा.खासदार महाडिक यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नेतेमंडळींना कोरोना च्या पार्श्वभूमीवर तसेच शेतीवर आलेल्या विविध नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा अडचणीत असल्यामुळे निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले होते. भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा संग्राम चव्हाण यांनी पुढाकार घेऊन टाकळी सिकंदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम जनतेच्या मनात असूनही ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये सामील होण्याच्या महत्वकांक्षेमुळे खुद्द गाव पातळीवरील नेतेमंडळींनी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी नकारात्मकता व आज दर्शविल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.
अनेक गावांमध्ये जशा दुसऱ्या आघाड्या स्थापन झाल्या तशी इथेही तिसरी आघाडी स्थापन झालेली आपणास दिसून येते. आजपर्यंत जी मंडळी सत्तेपासून व लाभापासून पासून वंचित राहिली होती अशा मंडळींनी एकत्र येऊन तिसऱ्या स्वतंत्र पॅनलची निर्मिती केली आहे.परंतु या तिसर्या आघाडीला संपूर्ण 15 जागांवर उमेदवार देता आले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजन पाटील यांच्या गटाच्या पॅनल ला काही जागांवर जागांवर उमेदवार न मिळवता आल्यामुळे काही जागांवर एका उमेदवाराला दोन वॉर्डांमध्ये उमेदवारी देण्याची नामुष्की आली. राष्ट्रवादी काँग्रेस राजन पाटील गटाच्या पॅनलचे नेतृत्व श्री ज्ञानेश्वर चव्हाण श्री शिवाजीराव चव्हाण व श्री अशोकराव चव्हाण हे करत असून तिसऱ्या आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व श्री पोपट वसईकर सिद्धेश्वर वसेकर हे करत आहेत.खा.धनंजय महाडिक पॅनल नेतृत्व प्रा. संग्राम चव्हाण श्री सुनील चव्हाण व श्री हिंमत पाटील हे करत असून भीमा परिवाराच्या या तीन दिग्गज नेत्यांच्या गटांचं मनोमिलन घडवून आणण्यात श्री महाडिक यशस्वी झाल्यामुळे महाडिक गटाच्या पॅनलची ताकद वाढली असून प्रचारामध्ये महाडिक पॅनलचा जोर दिसत आहे. अनेक कुटुंबातील तरुणांना भीमा कारखान्यांमध्ये नोकरी मिळवून दिल्यामुळे व अगोदरच सत्तेत असल्यामुळे कामांच्या माध्यमातून अनेक माणसं जोडल्यामुळे तसेच भीमा कारखाना सध्या सुरळीतपणे सुरु झाल्यामुळे ऊस गाळपाचा बिलांचा प्रश्न सुटल्यामुळे महाडिक पॅनल ला ही निवडणूक सोपी झाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत आहे. भीमा कारखाना ही या भागाची आर्थिक वरदायिनी असल्यामुळे त्यावर अनेक कुटुंब अवलंबून असल्यामुळे महाडिक पॅनलचा विजय विजय निश्चित होईल अशी परिसरात जोरदार चर्चा आहे. गट पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा तिरंगी लढतींमध्ये महाडिक परिवार प्रणित प्रा संग्राम चव्हाण व श्री सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २ पॅनलमध्ये स्वतंत्रपणे लढत होऊनसुद्धा मतांची विभागणी होऊन सुद्धा महाडिक गटाच्या पॅनलचा विजय झाला होता.
महाडिक परिवाराच्या या दोन्ही पॅनल कडे एकूण मतदानाच्या 70 टक्के एवढे मतदान राखण्यात महाडिक परिवार यशस्वी झाले होते. यंदाचे निवडणुकीमध्ये महाडीक परिवाराचे सर्व नेते मतभेद विसरून एकत्र येऊन लढत असल्यामुळे ताकद वाढली असून त्यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.
चौकट:-
भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. पण काही विघ्नसंतोषी व सत्ताअभिलाषि लोकांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होऊ न दिल्यामुळे टाकळी सिकंदर मधे तिरंगी लढत निवडणुक लागली. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर व सर्व शेतकर्यांना आलेल्या नैसर्गिक संकटांमळे या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन यावेळी धनंजय महाडिक यांनी सर्व मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीना केले होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.