(१२लाख ३९हजांराची दारू जप्त)
सोलापूर // प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू तयार होणाऱ्या १४ ठिकाणी छापा टाकून १२ लाख ३९ हजार २०० रुपयांची दारू नष्ट करून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीण दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अवैध व्यवसायांवर कारवाईची विशेष मोहीम राबवून प्रत्यक्ष सहभाग घेऊन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथे कारवाई केली. यापुढेही सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैद्य धंद्यावर कारवाई सुरू राहणार असून संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. सदरच्या कामगिरीमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सहभागात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुहास जगताप,पोलीस निरीक्षक फुगे, सपोनि काजळकर सपोनि बंडगर, तावरे, दळवी,इंगळे पिंगवाले, महिला शिपाई गोडबोले, तसेच ग्रामीणचे आरसीबी पथक, क्यू आर टी पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी या कारवाईत भाग घेतला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.