माढा मतदारसंघातील ,अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना अनुदानाची रक्कम आठ दिवसात बँक खात्यात जमा होणार.




एकूण 57 कोटी 60 लाख रुपये मिळणार:- आ.बबनदादा शिंदे

                                     

सोलापूर // प्रतिनिधी

माढा विधानसभा मतदारसंघातील माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील एकूण समाविष्ट गावाची, मागील पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त पुरामुळे झालेल्या नुकसानभरपाईची 57 कोटी 60 लाख रुपये रक्कम, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली असून येत्या आठ दिवसाच्या आत तहसील कार्यालयामार्फत संबंधित रक्कम संबंधित नुकसानग्रस्त खातेदाराच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी  दिली आहे.

     सविस्तर वृत्तांत असा की मागील 2020च्या  पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि  भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेती घरे व इतर बागायत व जिरायत पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यासाठी  शासनाने जिरायती पिकासाठी हेक्‍टरी दहा हजार रुपये व बागायती पिकासाठी फॅक्टरी अठरा हजार रुपये अनुदान मंजूर केले होते. मंजूर केलेल्या रकमेपैकी 50 टक्के  रकमेचे  वाटप दिवाळीनंतर झालेले होते,व आता सध्या उर्वरित 50 टक्के रक्कम मंजूर होऊन माढा, पंढरपूर व माळशिरस तहसील कार्यालयाकडे जमा झालेली असून त्यांचे मार्फत आठ दिवसाच्या आत संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांना त्याच्या  बँक खात्यावर पैसे जमा होतील असे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले आहे .याप्रमाणे आता माढा तालुक्यात साठी 27 कोटी 48 लाख 74 हजार, पंढरपूर तालुक्यासाठी 48 कोटी 96 लाख दहा हजार ,व माळशिरस तालुक्यासाठी 11 कोटी 90 लाख 48 हजार रुपये अनुदान रक्कम प्राप्त झालेले आहे. माढा तालुक्यातील 118 गावाला 27 कोटी 48 लाख रुपये रक्कम मिळणार आहे ,माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 14 गावांना  दोन्ही हप्त्याची मिळून 11 कोटी 90 लाख 48 हजार रुपये  अनुदान रक्कम मिळणार आहे तर पंढरपूर तालुक्यातील माढा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 42 गावांना संपूर्ण पंढरपूर तालुक्यासाठी एकूण मंजूर असलेल्या 48 कोटी 96 लाख रुपये पैकी 18 कोटी 32 लाख रुपये रक्कम मिळणार आहे. अशी एकंदरीत 57 कोटी 60 लाख रुपये रक्कम माढा मतदारसंघासाठी मिळणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

           या पूरग्रस्त व अतिवृष्टी नुकसान ग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मंजूर होऊन आलेली रक्कम संबंधित नागरिकांच्या बँक खात्यावर जमा केली जाइल अशी माहिती माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण ,माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर  व पंढरपूरचे तहसीलदार विवेक साळुंके यांनी दिली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget