सोलापूर // प्रतिनिधी
आज माळेगाव तालुका बारामती येथे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्यामार्फत आयोजित केलेल्या "कृषिक सप्ताह "या कृषी प्रदर्शन निमित्ताने भेट दिली.यामध्ये शेतीशी निगडित विविध बी-बियाणे ,फुलशेती ,फळबागा व शेतीविषयक विविध तंत्रज्ञान, औजारे याविषयी माहिती घेतली.
सध्याच्या डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सोप्या पद्धतीने व कमी खर्चात करता येते.त्यासंदर्भात काही नवीन गोष्टी अश्या कृषी मेळाव्यातुन बघायला मिळतात.
यावेळी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनंदा राजेंद्र पवार यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.